prisoners  Dainik Gomantak
गोवा

'ही तर धर्मांतराची विशेष मोहिम', गांधी जयंतीला चर्चेसकडून कैद्यांशी संवाद कार्यक्रमावरुन हिंदू रक्षा महाआघाडीची टीका

या संवाद कार्यक्रमाला सरकारने परवानगी दिली आहे, असा आरोप महाआघाडीने केला आहे.

Pramod Yadav

गांधीजयंतीचे निमित्त तुरुंगातील पुरुष व महिला कैद्यांशी तुरुंगात जाऊन स्वतंत्र वार्तालाप करण्याचा कार्यक्रम चर्चेसकडून आयोजित केले आहेत, असा संदेश व्हायरल होत आहे. कमकुवत मनःस्थितीतील कैदी व त्यांच्या कुटुंबियांना हेरून ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर घडवण्यासाठीच ही विशेष मोहिम चर्चने योजली आहे. असा आरोप हिंदू रक्षा महाआघाडीने केला आहे.

या संवाद कार्यक्रमाला सरकारने परवानगी दिली आहे, असा आरोप महाआघाडीने केला आहे. कैद्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कैद्यांना कायदा-सल्ल्याकरता वकिलाची फी ची तरतूद करण्यासाठी खास भिक्षा-वर्गणी या नावाने जनतेकडून पैसे गोळा करण्याची मोहिम चर्चने सुरू केलेली आहे. असेही महाआघाडीने म्हटले आहे.

या मोहिमेच्या अंतर्गत, जेलमधील 30 ते 50 पुरुष कैदी व 30 महिला कैदी अशा गटागटांनी वार्तालाप आयोजित करण्यात आलेले असून, प्रत्यक्ष तुरुंग महारक्षकांची परवानगी या उपक्रमाना मिळाल्याचे संदेश सर्वत्र गेलेले आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.

गांधी जयंतीला दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते 11.30 वाजेपर्यंतच्या या कार्यक्रमासाठी तुरुंग महारक्षक देखील उपस्थित राहणार आहेत.

जेलमध्ये घुसून अशा प्रकारे कैद्यांना सामील करून घेण्याच्या मोहिमेला दिलेली परवानगी सरकारने त्वरित मागे घ्यावी व अशा कार्यक्रमांचे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहण्यावर आय.जी.पी.ना बंदी घालावी अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT