IRCTC Goa Tour Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: या ख्रिसमला करा गोव्याचा प्लॅन, IRCTC देतयं भन्नाट ऑफर

टूर पॅकेजमध्ये तुम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रवास आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

Pramod Yadav

IRCTC Goa Tour Package: नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. गोव्यात मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव राहतात, तसेच याठिकाणी अनेक चर्च देखील आहेत. गोव्यात चर्च आणि ख्रिसमस उत्सव (Christmas In Goa) पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक हजेरी लावत असतात. पण, यावेळी नाताळ साजरा करण्यासाठी तुम्ही गोव्याची निवड करू शकता. यासाठी IRCTC ने खास ऑफर देखील आणली आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रवास आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

काय आहे IRCTC चे टूर पॅकेज

- पॅकेजचे नाव- ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे

- पॅकेज कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस

- प्रवासाचे माध्यम - फ्लाइट

- काय होणार कव्हर - उत्तर आणि दक्षिण गोवा

- प्रवासाची तारिख - 22 डिसेंबर 2022

पॅकेजच्या सुविधा

1. परतीच्या प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे फ्लाइट तिकीट.

2. राहण्यासाठी हॉटेलची सुविधा.

3. चार वेळचा नाश्ता, चार रात्रीच्या जेवणाची सोय.

4. या पॅकेजमध्ये प्रवास विमा देखील समाविष्ट आहे.

पॅकेज शुल्क

1. टूरसाठी एकटे प्रवास केल्यास 51,00 रुपये मोजावे लागतील.

2. तर, दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती 40,500 रुपये शुल्क भरावे लागेल.

3. तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती 38,150 रुपये शुल्क भरावे लागतील.

असे करा बुकिंग

गोवा टूर पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही या टूरचे बुकिंग करता येऊ शकते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT