Goa Margao Police Dainik Gomantak
गोवा

Goa Margao Police: नाताळनंतर नववर्षांच्या पार्श्वभूमीवर मडगावात पोलिसांतर्फे 'मॉक ड्रिल'

Goa Margao Police: कोलवा पोलिसांसह दहशतवादीविरोधी पथकाने कोलवा रेसिडेन्सी येथे मॉक ड्रिल केले.

दैनिक गोमन्तक

Goa Margao Police: नाताळ व नंतर नववर्षाची सुरवात यामुळे पर्यटकांची गर्दी उसळणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी व तपासणी करण्यासाठी पोलिसांनी मडगाव व कोलवा येथे मॉक ड्रिलचे आयोजन केले. कोलवा पोलिसांसह दहशतवादीविरोधी पथकाने कोलवा रेसिडेन्सी येथे मॉक ड्रिल केले.

कोलवा पोलिसांच्या हद्दीत केळशी ते माजोर्डा या समुद्र किनारपट्टीचा भाग येतो. तरीही कोलवा पोलिसांची कुमक वाढविण्यात आलेली नाही. या मॉक ड्रिलमध्ये सुरक्षा व्यवस्था कशी करता येते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. नंतर पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक थेओरन डिकॉस्‍टा व एटीएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल केले.

मडगाव पोलिसांनी पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक व एटीएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव नगरपालिका इमारत तसेच न्यू मार्केट परिसरात ही मोहीम राबविली. सध्या मडगाव पोलिस बेकायदेशीर व नियमबाह्य वाहतूक प्रकरणी सर्व्हेक्षण करीत असून गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक चालकांना तालांव देण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात केली पडताळणी

सुरक्षा व्यवस्था कशी करता येऊ शकते व नागरिकांमध्ये आत्मविश्र्वास कसा वाढविता येईल, यासंदर्भात हे मॉक ड्रिल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले. पुढेही ही मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT