Chorla Ghat Belgaum Road  Dainik Gomantak
गोवा

Chorla Belgaum Road: चोर्लाघाट–बेळगाव रस्ता धोकादायक! खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था; कर्नाटकचे निकृष्ट काम

Chorla Ghat Road: केरी ते चोर्लाघाट मार्ग कर्नाटक सीमेपर्यंत सुस्थितीत असला तरीही तरी दोन्ही बाजूंची गटार व्यवस्था नादुरुस्त आहे, अनेक ठिकाणी गटारांचा उपसा झालेला नाही.

Sameer Panditrao

चोर्लाघाट: केरी ते चोर्लाघाट मार्ग कर्नाटक सीमेपर्यंत सुस्थितीत असला तरीही तरी दोन्ही बाजूंची गटार व्यवस्था नादुरुस्त आहे, अनेक ठिकाणी गटारांचा उपसा झालेला नाही. जागोजागी गेल्यावर्षी पडलेली झाडे हटविण्यात आली नाहीत. कर्नाटकातील एप्रिल-मे महिन्यात केलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. बऱ्याच ठिकाणी खड्ड्यातून रस्ता शोधत बेळगावकडे मार्गक्रमण करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

अंजुणे धरणापासून पुढे कर्नाटक सीमेपर्यंत अनेक काही ठिकाणी शक्य तेथे रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा समस्या कमी झाली परंतु अनेक ठिकाणी गटार व्यवस्थाच नाही. ज्या ठिकाणी गटार व्यवस्था आहे, तेथे गटारे भरलेली आहेत. यंदाचा पावसाळा संपत आला, तरीसुद्धा त्या गटाराची अवस्था असून नसल्यासारखी आहे.

काही ठिकाणी गेल्या वर्षी दरडी कोसळल्या होत्या. त्यावेळी फक्त रस्त्यांवरील माती हटविण्यात आली, पण वर्षभरानंतरही गटारातील माती काढण्यात आली नाही.

ही माती काढण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे? असा प्रवासी सवाल करीत आहेत. यंदाच्या पावसातही काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी झाडे पडलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते – रस्ता विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून ही कामे त्वरित करणे गरजेचे आहे, असेही प्रवाशांचे मत आहे.

अवजड वाहनाची अडचण

चोर्लाघाटात दिवसा अवजड वाहनांवर बंदी असूनही अवजड वाहने घाटमार्गावरून प्रवास करतात. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. चतुर्थीच्या काळातही काही ठिकाणी अवजड वाहने घाटमार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेली होती, काही नादुरुस्ती होती, त्यामुळे इतर वाहनांना पुढे जाताना अडचण निर्माण होत आहे.

कर्नाटकचे निकृष्ट काम

कर्नाटक शासनाने गेल्या एप्रिल-मे महिन्यात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले, परंतु कामाची दर्जा सांभाळला नाही. रस्ता कामात भ्रष्टाचार झाल्याचे संशय वाहनचालक व्यक्त करीत आहेत. कारण पहिल्याच पावसात बहुतांश रस्ता खराब झाला आहे. त्या तुलनेत गोव्याच्या हद्दीतील रस्ता दोन-तीन वर्षे झाली, तरीसुद्धा उत्तम आहे. कर्नाटक शासनाचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे, इतके मोठे खड्डे पडूनही कुठेही पावसाळ्यात डागडुजी हाती घेतलेली नाही. निकृष्ट काम करणारा कंत्राटदारही बिनधास्त आहे, कर्नाटक शासनाकडून अद्याप या रस्त्यांची दखल घेतलेली नाही.

वाहनांचे नुकसान

गोव्याच्या सीमेपासून ते जांबोटीपर्यंतचा नवा रस्ता पहिल्याच पावसात दयनीय अवस्थेत पोचला असून आगामी महिनाभरात संपूर्ण रस्ता खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे. वाढती अवजड वाहतूक आणि प्रचंड पडणारा पाऊस. यामुळे रस्त्यावर खूपच मोठे खड्डे पटले आहेत. या खडड्यातून दुचाकी, छोटी चारचाकी वाहने चालविणे कठीण होत आहे. एक चाक खड्ड्यातून वाचविताना इतर तीनही चाके खड्ड्यात जात आहेत. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. बेलगावच्या पालक मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT