Goa Accidents Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Accident: जीवन-मरणाचा लढा थांबला, चोर्ला घाट अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

Chorla Ghat Death: या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करत असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूमुळे सुर्ला गावात शोककळा पसरली आहे.

Sameer Panditrao

वाळपई: चोर्लाघाटातील जांबळी परिसरात ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेल्या सुर्ला (सत्तरी) येथील सूरज भिकाजी गावस (२७) याचा शनिवारी (ता.१०) सकाळी गोमेकॉत (गोवा वैद्यकीय महाविद्यालय) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, सूरज गावस हा वन विभागात कार्यरत होता आणि चोर्लाघाटातील जांबळी परिसरात ड्युटी करत होता. बुधवारी सायंकाळी ड्युटीवर येत असताना त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून स्वयंअपघात झाला होता.

या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रथम त्याला साखळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले. चार दिवसांपासून सूरज जीवन-मृत्यूशी लढा देत होता. मात्र, अखेर शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करत असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूमुळे सुर्ला गावात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT