Chopdekar elected as Mormugao Deputy Mayor, Mormugao Municipal Council News Updates, Amey Chopdekar News, Mormugao Palika News Dainik Gomantak
गोवा

मुरगाव उपनगराध्यक्षपदी चोपडेकरांची निवड

एकमेव अर्ज: आज निवडीची औपचारिक घोषणा

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी उद्या (29 रोजी) निवडणूक होणार असून अमेय चोपडेकर यांची निवड निश्‍चित झाली आहे. प्रभाग 18 चे नगरसेवक चोपडेकर यांचा एकमेव अर्ज आज मुख्याधिकारी जयंत तारी यांच्याकडे आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्‍चित आहे. (Mormugao Municipal Council News Updates)

श्रद्धा महाले यांनी 15 मार्च रोजी मुरगावच्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेली जागा भरण्यासाठी पालिका संचालक कार्यालयाने उद्या मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बैठक बोलावली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी आज (२८ मार्च) उमेदवारी अर्ज सादर करावेत, असे पालिका संचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आले होते.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे समर्थन असलेले नगरसेवक चोपडेकर उपनगराध्यक्ष बनणार असल्याची चर्चा आधीच रंगू लागली होती. विधानसभा निवडणुकीत वास्कोत पराभूत झालेले कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेल्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले यांच्याविरुद्ध 25 पैकी 16 नगरसेवकांनी अविश्‍वास ठरावाची नोटीस पालिका संचालकांकडे सुपूर्द केली होती. 14 रोजी 16 नगरसेवकांनी अविश्‍वास ठरावाची नोटीस जारी केल्यानंतर अविश्‍वासाचा निर्णय जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला न थांबता महाले यांनी पदाचा राजीनामा दिला.

आज पालिका सभागृहात बैठक

रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक होणार आहे. मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गवस देसाई निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या बैठकीत फक्त औपचारिकता बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT