Chodan Raibandar Ro-Ro Ferry Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferry: सोलर फेरी बंद झाली, रो-रो सेवा सुरु रहावी! चोडण- रायबंदर प्रवाशांची मागणी; 1 जुलैपासून होणार सुरवात

Chodan Raibandar Ro-Ro Ferry: सरकार चोडण-रायबंदर जलमार्गावर १ जुलैपासून ‘रो-रो’ फेरी सुरू करण्याच्या तयारीत आहे, परंतु सोलर फेरीसारखीच या फेरीची देखील स्थिती होईल की काय, याबाबत प्रवाशांना चिंता सतावत आहे.

Sameer Panditrao

पणजी: सरकार चोडण-रायबंदर जलमार्गावर १ जुलैपासून ‘रो-रो’ फेरी सुरू करण्याच्या तयारीत आहे, परंतु यापूर्वी सुरू केलेल्या सोलर फेरीसारखीच या फेरीची देखील स्थिती होईल की काय, याबाबत प्रवाशांना आतापासूनच चिंता सतावत आहे.

सरकारने सौर उर्जेवर चालणारी पहिली प्रवासी फेरी ‘सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड’चे ऑक्टोबर २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात उद्‍घाटन केले होते. यामुळे पणजी ते चोडण येथील रायबंदरला न जात थेट पणजीत येऊ शकत होते. येथील रहिवाशांची सोय म्हणून ही फेरी सुरू करण्यात आली होती मात्र त्याचा वापर झालेला लोकांना काही दिसला नाही. अजूनही ही फेरी बंद अवस्थेत पडून आहे.

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय बंदर, जलवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत गोव्यातील पहिल्या सौर-ऊर्जेवरील हायब्रीड प्रवासी फेरी आणि फ्लोटिंग जेटीचे लोकार्पण करण्यात आले होते.

सुमारे ३.९ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही फेरी पणजी-चोडण मार्गावर सुरू होणार होती. सुरवातीच्या १५ दिवसांसाठी प्रवास मोफत ठेवण्यात येणार होता, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु ही फेरी पूर्णपणे बंद अवस्थेत पडून आहे.

पणजीतील फ्लोटिंग जेटीवर ती पडून आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळच नाही, अशी कबुली नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील दिली होती.

ते म्हणाले होते की, ही पारंपरिक फेरी नव्हे, हायब्रीड प्रणालीमुळे प्रशिक्षित कर्मचारी लागतात. आम्ही सध्या उत्पन्नाचे मॉडेल शोधत आहोत. नदी परिवहन खात्याने चोडण-रायबंदर मार्गावर ''रो-ऑन/रो-ऑफ'' (रो-रो) फेरीचे यशस्वी चाचणी नुकतेच पूर्ण केली आहे.

रो-रो फेरीसाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

पर्यटकांसाठी ५०, पर्यटक वाहन दुचाकी १००, चारचाकी ३०० रु.

स्थानिकांसाठी प्रवास मोफत, दुचाकी १०, चारचाकी ३० रु.

मासिक पासचीही योजना – दुचाकी ५, चारचाकी १५ रु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

SCROLL FOR NEXT