Chimbel Dainik Gomantak
गोवा

Chimbel: चिंबल पठारावरील 'ती' जागा पूर्ववत करा; ग्रामस्थांकडून सरकारला 7 दिवसांची मुदत, पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Chimbel Unity Mall Protest: युनिटी मॉलसाठी जागा अधिग्रहीत करताना चिंबल पठारावर ‘तोय्यार तलावा’च्या जवळील जमिनीवर खोदकाम केले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: युनिटी मॉलसाठी जागा अधिग्रहीत करताना चिंबल पठारावर ‘तोय्यार तलावा’च्या जवळील जमिनीवर खोदकाम केले होते. ती जमीन सात दिवसांच्या आत पूर्ववत न केल्यास नव्याने आंदोलन छेडण्याचा इशारा गुरुवारी (ता.१६) चिंबलच्या ग्रामस्थांनी दिला.

याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्याकडे सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी चिंबल ग्रामस्थांनी धडक दिली. गोविंद शिरोडकर, अजय खोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवदेन सादर केले.

उपजिल्हाधिकारी परब यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी खोलकर म्हणाले की, ‘तोय्यार’ तलावापासून काही अंतरावर ही जागा आहे. त्यामुळेच युनिटी मॉलला ग्रासस्थांनी विरोध केला होता.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी स्वीकारले. त्यावर परब म्हणाले, हे निवेदन वरिष्ठांना दाखविले जाईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल. सर्व नागरिकांनी येथून हटावे, अशी विनंतीही त्यांनी केली. याप्रसंगी प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT