Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

कांदोळीतील गँगस्टर्स टोळीने केला मुलांवर हल्ला

साहिन सौदागर यांचा आरोप: कळंगुट पोलिसांची कारवाईत दिरंगाई

दैनिक गोमन्तक

पणजी: कांदोळी येथे गँगस्टर्स टोळीकडून आपल्या मुलांवर हल्ला करण्यात आला. एका मुलाच्या डोक्यावर हॉकी स्टीक व बॅटने झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तो इस्पितळात बेशुद्धावस्थेत आहे. या घटनेप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दिली त्याला आठवडा उलटून गेला, तरी मुख्य हल्लेखोरास अटक केली जात नसल्याचा आरोप मुलाची आई साहिन सौदागर यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना इस्पितळात उपचार सुरू असलेल्या अब्दुल याची आई साहिन सौदागर हिने सांगितले की 7 मे रोजी ही मारहाणीची घटना घडली होती. माझ्या निष्पाप तीन मुलांना एका गँगस्टर्स टोळीने मारहाण केली. या मारहाणीत आपला मुलगा अब्दुल याच्या डोक्याला बरेच टाके पडले असून त्याची जगण्याची शाश्‍वती डॉक्टरांनी दिलेली नाही. तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे, तर ज्याने मारहाण केली तो मात्र मोकाट आहे व पोलिस त्याला अटक करण्यासाठी कोणतीच ठोस पावले उचलत नाहीत.

कांदोळी येथे एका क्लबमध्ये मी कामाला आहे. त्या ७ मे रोजी संध्याकाळी मी मालकाला भेटण्यास गेले होते. माझ्यासोबत माझी तीन मुलेही होती. त्या ठिकाणी पर्यटक व गाईड यांच्यामध्ये वाद सुरू होता. माझी मुले बाहेर उभी होती. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका तरुणाने माझ्या मुलांना हातानी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे माझ्या एका मुलाने ही माहिती दिल्यावर मी तेथे गेले व मारहाणीचे कारण विचारले, तर त्या तरुणाने मलाही लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर हा तरुण इतरांना घेऊन आला. त्यावेळी त्यांच्याकडे हॉकी स्टीक व बॅट होती. या हॉकी स्टीकने अब्दुल याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्याच्या डोक्याला जबर जखम झाली, तर मी बेशुद्धावस्थेत तेथे कोसळले, अशी माहिती त्या महिलेने दिली.

या घटनेनंतर मला कळंगुट पोलिस स्थानकात आणले, त्यावेळी माझ्या सोबत मुले नव्हती. जखमी अब्दुल याला गोमेकॉ इस्पितळात नेले होते, तर हल्लेखोर इतर दोन मुलांचा पाठलाग करत होते. पोलिस स्थानकात मी दोनवेळा बेशुद्ध पडले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर तक्रार दिली. अब्दुल याला इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळाल्यावर तेथे धाव घेतली असता तो बेशुद्धावस्थेत असून डॉक्टरांनी त्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. माझ्या मुलांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा अशी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हल्लेखोरांना अटक करण्याऐवजी आपल्या इतर दोन मुलांना अटक केली व त्यांना जामीन देऊन पोलिसांत हजेरी लावण्यास सांगितले जात आहे. स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही मदत करतो म्हणून सांगून अजून काहीच केले नाही. त्यामुळे या हल्लेखोरांच्या पाठिशी राजकारणी आहेत का असा संशय येतो, असे सौदागर यांनी सांगितले.

दोघांना अटक, एक फरारी

कळंगुट पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनेच्या पहिल्याच दिवशी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर ज्याने अब्दुल याच्यावर हल्ला केला तो अजूनही फरारी आहे व त्याचा शोध घेण्यात येत आहे. मुख्य संशयिताचा शोध घेण्यात येऊन अटक केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT