Children with Kavya Methi.
Children with Kavya Methi. 
गोवा

मुलं झाली पोरकी, ‘कोव्या’चा गेला आधार

Dainik Gomantak

पेडणे

काव्या मेथी ह्या राहतात भाड्याच्या घरात. पदरी दोन मुले. त्यातील मोठी मुलगी सहा वर्षांची तर मुलगा दोन वर्षांचा. माहेरी त्यांनी फक्त घरकाम केलं. त्यामुळे हॉसपेट-कर्नाटकमध्ये लग्न होऊन पती नोकरीनिमित्त पेडण्यात आले. त्यावेळी या महिलेने गृहिणी म्हणून घरात काम केल. दोन अपत्ये झाली. पती दिवसभर काम कष्ट करून घरी यायचा. परिस्थिती सामान्य असूनही काव्या आणि बसव्वाचा सुखाचा संसार चालला होता. अशातच पती बसवराजने रानात गळफास लावून आत्महत्या केली. 
पतीच कुटुंब, माहेर हे सर्व कर्नाटकात. कोरोना संकटामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं तर अनेक नियम, कायदे. दुसऱ्या बाजूने मुलीची शाळा सुरू झाली आहे. माणसे फक्त तीन असली तरी प्राप्तीचे कसलेही साधन नाही. आधार गेलेल्या ‘काव्या’ची अवस्था केविलवाणी बनली. आज २३ जून रोजी जागतिक विधवा दिनी या घटनेला पंधरा दिवस होत आहेत. आता आपण आणि दोन लहान मुलांनी काय करायचे आणि कसे जगायाचे? असे अनेक प्रश्‍न न्यूवाडा-पेडणे येथे रहाणाऱ्या काव्या बसवराज मेथी या महिलेसमोर उभे राहिले आहेत. या कुटुंबाला सरकारी योजना आणि मदतीची गरज आहे. 
२०११ मध्ये बसवराज व काव्या यांचा प्रेम विवाह कर्नाटकमधील कुरवावणी-बळ्ळार हॉस्पेट येथे झाला. ट्रक चालक म्हणून बसवराज पेडणे येथे आला. त्याला घर, इमारतीसाठीचे सेन्ट्रींगही येत होते. ट्रक चालकाचे काम सोडून त्याने काही दिवस कंत्राटदाराकडे सेन्ट्रींगचे काम केले. नंतर त्याने सेंन्ट्रीगची स्वत:च कंत्राटे घेण्यास सुरवात केली. त्यासाठी त्याने या व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी केले. याच काळात बसवराज व काव्या यांना दोन अपत्ये झाली. मोठी मुलगी. तिचे नाव मेघना. दुसरा मुलगा विजय. मेघनाचे वय सहा वर्षे. ती पेडणे येथील हुतात्मा मनोहर पेडणेकर सरकारी प्राथमिक शाळेत दुसरी इयत्तेत शिक्षण घेते. तर विजय केवळ दोन वर्षांचा. तो बालवाडीत जातो. 
काव्या ही मध्यमवर्गीय मुलगी. दहावीपर्यंत शिक्षण. माहेरी घरातील स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी यायच्या. त्यामुळे पती बसवराजबरोबर पेडणे येथे आल्यावर भाड्याच्या खोलीत काव्याने गृहिणी म्हणून चांगली कामगिरी बजावून संसाराला हातभार लावला. पण, संध्याकाळी किंवा रात्री वेळेवर घरी परतणारा बसवराज हे ८ जून २०२० रोजी घरी न परतल्याने काव्याने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी शक्‍यता असलेल्या सगळ्या ठिकाणी शोध घेतला. पण, तो न सापडल्याने पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आणि १० जून रोजी बसवराज गळफास लावलेल्या अवस्थेत पेडणे आयटीआय जवळच्या रानात सापडला. 
बसवराजच्या या जाण्याने पत्नी काव्याला वैधव्य आले. दोन कोवळ्या मुलांचे पीता छत्र हरवले. बसवराज-काव्या हे दांपत्याला पेडण्यात येऊन नऊ-दहा वर्षे झाली तरी त्यांनी कर्नाटकमधील आपल रेशन कार्ड, आधारकार्ड वगैरे गोव्यात बदलून घेतले नाही. अशा या विचित्र स्थितीत काव्या सापडली आहे. या कुटुंबाला पाहिजे सरकारी योजना व मदतीची गरज आणि शक्‍य तर काव्या स्वत:च्या पायावर उभी राहून कुटूंब चालवू शकेल अशी सरकारी योजना व मदतीची गरज आहे. 

पेडण्यातील लोकांकडून माणुसकीचे दर्शन... 
बसवराज-काव्या हे दाम्पत्य न्यूवाडा कॉलनीतील सगळ्या घरात मिळून मिसळून वागत असत. सगळ्या कुटुंबातून बसवराज असा काही निर्णय घेईल, असे कुणालाच वाटले नव्हते. न्यू कॉलनीतील लोकांना तो मोठा धक्का होता. न्यू कॉलनीतील सगळे लोक एकत्र आले व या कुटुंबाला जीवनावश्‍यक वस्तू मुलांचे शिक्षण वगैरेचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला आहे.

Goa Goa Goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Farmer : गोमूत्र फवारणीमुळे काजू उत्पादनात वाढ; मिलिंद गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी

Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

SCROLL FOR NEXT