Goa Kidnap Case Dainik Gomantak
गोवा

kidnaping Case: न्हावेली-साखळी येथून बालकाचे अपहरण करणारा मुंबईत जेरबंद

kidnaping Case: डिचोली पोलिसांची कारवाई : अपहृत 8 वर्षीय बालकाची सुटका

दैनिक गोमन्तक

kidnaping Case:

न्हावेली-आमोणे (साखळी) येथून 8 वर्षीय बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित आरोपी फेको कुमार (मूळ बिहार) याला कल्याण- मुंबई येथे अटक करण्‍यात आली. अपहृत बालकाची सुखरूप सुटका करण्यासही पोलिसांना यश आले. दरम्‍यान, संशयिताला सध्या सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

संशयित फेको कुमार हा न्हावेली-आमोणे येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथूनच 13 मार्च रोजी त्‍याने एका 8 वर्षीय बालकाचे अपहरण केले. याप्रकरणी मूळ बिहार येथील आणि न्हावेली-आमोणे येथेच राहणारे शरीफ शाह (44) यांनी दि. 14 रोजी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या 363 आणि बालहक्क कायदा : 2003 अंतर्गत कलम 8 खाली गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

अन् मोहीम झाली फत्ते

तपासादरम्यान अपहरण झालेल्या बालकाच्या खोलीशेजारीच राहणारा फेको कुमार हासुद्धा गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्‍यानेच बालकाचे अपहरण केल्याचा संशय बळावला. मोबाईल लोकेशनवरून संशयित मुंबईत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांची दोन स्वतंत्र पथके त्‍याच्या मागावर पाठविण्‍यात आली. शेवटी मुंबईतील कल्याण येथे संशयिताला जेरबंद करण्‍यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्‍या साहाय्‍याने पोलिसांनी अपहृत बालकाचा शोध लावला व सुखरुप पालकांच्‍या स्‍वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT