Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ अधिसूचित ; राज्यात महिलांना स्वयंरोजगार संधी

नगरपालिका प्रशासनाकडे त्यासाठी गटांनी विनंती केल्यास सहा महिन्यासाठी तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येईल

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, सरकारी कार्यालये तसेच संबंधित महामंडळे, मंडळे व स्वायत्त संस्थांमधील कँटीन सेवा स्वयंसहाय्य गटांना (एसएचजी) चालवण्यासाठी देण्यासंदर्भातची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सरकारतर्फे अधिसूचित करण्यात आली आहे.

गोव्यात सुमारे ४ हजाराहून अधिक स्वयंसहाय्य गट आहेत त्यांना या सरकारच्या निर्णयामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही कँटीन सेवा देण्यासाठी स्वयंसहाय्य गटांना ग्रामीण विकास खात्याकडे अर्ज करावा लागेल.

हे स्वयंसहाय्य गट एनआरएलएम किंवा एनयूएलएम पोर्टलवर नोंदणी झालेले असणे आवश्‍यक आहे. जर त्यांची या पोर्टलवर नोंदणी नसल्यास ग्रामीण विकास, नगरपालिका प्रशासनाकडे त्यासाठी गटांनी विनंती केल्यास सहा महिन्यासाठी तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येईल

मात्र त्या काळात त्यांना एनआरएलएम किंवा एनयूएलएम पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. प्रत्येक गट कोणत्याही खात्यात एकच कँटीन चालवू शकते.

शहरात २० रु.प्रति चौ.मी.भाडे

जी सरकारी कार्यालये शहरी क्षेत्रात आहेत तेथील कँटीनच्या जागेनुसार प्रत्येक चौ. मी. जागेसाठी २० रुपये दराप्रमाणे भाडे द्यावे लागणार आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी ते प्रत्येक चौ. मी. जागेसाठी १० रुपये दर आकारला जाणार आहे.

स्वयंसहाय्य गटाना ही कँटीन त्यांना स्वतःलाच चालवावी लागणार आहे, ती इतरांना चालवण्यास देता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास त्या गटाचे कंत्राट रद्द करण्यात येईल. या कँटीनमधील खाद्यपदार्थांचे दर ठरवून दिल्यानुसार असणे आवश्‍यक आहे.

जर किंमती वाढवायच्या असल्यास त्यासाठी संबंधित अधिकारिणीची परवानगी घेण्याची आवश्‍यकता असेल, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT