Chief Minister Sawant said BJPs goal is 2022 elections
Chief Minister Sawant said BJPs goal is 2022 elections  
गोवा

२०२२ ची निवडणूक हे भाजपचे लक्ष्य: मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमन्तक

मडगाव: २०२२ ची विधानसभा निवडणूक हे भाजपचे लक्ष्य असून या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे सांगितले. सासष्टीतील सात मतदारसंघांतील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आज तीन ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 

सासष्टीतील सात मतदारसंघ धरून आतापर्यंत २८ मतदारसंघांत ही शिबिरे घेण्यात आली आहेत. उर्वरित मतदारसंघांतही ही शिबिरे घेण्यात येतील. २०२२ च्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ही शिबिरे घेण्यात येत आहेत,  असे सावंत यांनी सांगितले. 

भाजपच्या मूळ ध्येयधोरणानुसार संपूर्ण राज्याप्रमाणे सासष्टीतही पक्षकार्य करण्यात येते. सासष्टीची जनता ही गोमंतकीयच आहे. मुख्यमंत्री या नात्याने मी कसे काम करतो हे सासष्टीतील लोकांनाही कळू लागले आहे. आम्ही  स्वतःचे हित न पाहता राज्य प्रथम या तत्त्वानुसार काम करतो. मागचे २० - २२ महिने सरकारने केलेल्या कार्याची जाणीव सासष्टीवासीयांनाही आहे. त्यामुळे सासष्टीसाठी आणी वेगळे काही करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT