Drama Dainik Gomantak
गोवा

Goa Art: '...म्हणून नव्या नाटकांची निर्मिती होणे आवश्‍यक'- CM प्रमोद सावंत

‘स्वराज्याचा शिलेदार’ या नाटकाचा प्रथम प्रयोग पाळीतील नवदुर्गा सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे कालोत्सवात करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa Art: नवीन नाटकांची निर्मिती होणे ही काळाची गरज असून त्यासाठी गोमंतकीय लेखकांनी पुढे यावे, असे आवाहन करताना नाट्यलेखक महादेव अप्पा गावस यांच्या ‘स्वराज्याचा शिलेदार'' या नवीन नाटकाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक केले. देऊळवाडा-पाळी येथे महादेव गावस यांच्या नाटकाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

या नाटकाचा प्रथम प्रयोग पाळीतील नवदुर्गा सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे कालोत्सवात करण्यात आला. व्यासपीठावर नाट्यलेखक महादेव गावस, पाळीचे सरपंच शिवा मुळगावकर, नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष अजीत गावस, नाटकाचे दिग्दर्शक नरेंद्र तारी, संगीत दिग्दर्शक पं. कमलाकांत गावस आदी उपस्थित होते.

महादेव गावस, नरेंद्र तारी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. रघुवीर वर्दे यांनी केले. या नाटकात वेदांत गावस, प्रथमेश गावस, गंधार गावस, महादेव गावस, शिवानंद गावस, गुंजाईश गावस, भास्कर गावस, जयदेव गावस, भिंगो गावस, शारदा शेटकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. संगीत कमलाकांत गावस यांचे तर तबलासाथ जानू शिरवळकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT