Panaji solar City Dainik Gomantak
गोवा

Panaji solar City : पणजी शहराला दोन वर्षांत सोलर सिटी करू : मुख्यमंत्री सावंत

80 मेगावॅट विजेचे उद्दिष्ट

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji solar City : राजधानी पणजी शहराची ओळख ‘सोलर सिटी’ म्हणून करण्यासाठी येत्या 2 वर्षांत शासकीय व खासगी उपक्रमांतून शहरासाठी लागणारी 80 मेगा वॅट सौरऊर्जा निर्माण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (ता.17) दिली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘गेडा’ संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि या प्रकल्पाचे समन्वयक सचिव अजित रॉय उपस्थित होते.

सौर शहराचा दर्जा प्राप्त करणे हे राज्याचे शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित रॉय यांनी केले.

"या उपक्रमासाठी सरकारी इमारतींवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. ज्या व्यावसायिक आस्थापने, कॅसिनो इत्यादींसाठी छतावर सौरऊर्जा निर्मिती करणे शक्य नाही ते इतर कोणत्याही ठिकाणी सौरऊर्जा निर्मितीचा पर्याय निवडू शकतात आणि त्यातून निर्माण होणारी वीज ग्रीडमध्ये हस्तांतरित केली जाईल."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT