Lata Mangeshkar Dainik Gomantak
गोवा

लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मुंबईत दाखल

मुंबईतील शिवाजीपार्क येथे होणाऱ्या लता दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

Lata Mangeshkar: प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज 93व्या वर्षी सकाळी निधन झाले आहे. पूर्ण देश त्यांच्या निधनामुळे हळहळला आहे. आज रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील शिवाजीपार्क येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरातील अनेक दिग्गज मंडळी मुंबईत दाखल होत आहेत. (Chief Minister Pramod Sawant arrives in Mumbai to pay his last respects to Lata mangeshkar)

याचसंदर्भात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील अंत्यसंस्कारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. लता दीदी आणि गोव्याचे विशेष नाते आहे. शिवाय त्या देशातील अत्यंत महत्वाच्या आशा भारतरत्न व्यक्ति आहेत. यामुळे आपले आद्य कर्तव्य म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अंत्ययात्रेत सहभाग घेतला आहे.

कलाक्षेत्र, राजकारण, सामाजिक क्षेत्र अशा सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मुंबईत पोहोचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT