Mormugao Municipal workers Dainik gomantak
गोवा

मुख्यमंत्री साहेब आता आम्हाला नोकरीत कायम करा मुरगाव पालिका कामगारांची मागणी

ही, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या काही समस्या दूर होण्यास मदत होईल

दैनिक गोमन्तक

रोजंदारीवर गेली सात आठ वर्ष आम्ही काम करतो, आता आम्हाला नोकरीत कायम करा. अशी मागणी मुरगाव पालिकेच्या रोजंदारी कामगारांनी केली आहे. मुख्यमंत्री (CM) डॉ.प्रमोद सावंत यांनी रोजंदारीचे वेतन प्रतिदिन 500 रुपयांवरुन 700 रुपयांवर नेल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

मुरगाव (Mormugao) पालिकेमध्ये सुमारे 70 कामगार रोजंदारीवर काम करतात. गेली सात आठ वर्षे काम करणाऱ्या या कामगारांना प्रत्येक वर्षी कामासंबंधी नूतनीकरण करावे लागते. त्यांना विविध प्रकारची कामे करावी लागतात.

त्याचप्रमाणे त्यांना पाहिजे तेथे कामावर पाठवले जाते. परंतू आम्ही सांगितलेली सर्व कामे निमुटपणे करतो. असे काहीजणांनी सांगितले. आता आमच्या प्रतिदिन वेतनामध्ये सुमारे 200 रुपयांची वाढ झाली आहे. ही, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या काही समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच आम्हाला रजा देण्यात येणार असल्याचे कळते याबद्दल आम्ही डॉ. सावंत यांचे आभारी आहोत. असे त्यांनी सांगितले.

आम्ही गेली सात आठ वर्षे रोजंदारीवर काम करीत असल्याने आम्हाला कामावर कायम करण्यासाठी डॉ. सावंत यांनी विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आमच्या मागणीचा विचार करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT