Chief Minister Dr. Pramod Sawant has called for a report on the work of Kala Academy from the Public Works Department Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीच्या कामाचा मुख्‍यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितला रिपोर्ट; गावडेंचा पाय खोलात?

Kala Academy In Goa: कला अकादमीच्‍या कामाबाबतचा आत्तापर्यंतच्या सद्यःस्थितीचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे असलेल्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chief Minister Dr. Pramod Sawant: कला अकादमीच्‍या कामाबाबतचा आत्तापर्यंतच्या सद्यःस्थितीचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे असलेल्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागवला आहे. आता या अहवालानंतर कारवाई कोणावर होणार आणि खापर कोणाच्‍या डोक्‍यावर फुटणार, हे स्‍पष्‍ट होणार आहे.

कला अकादमीतील गळतीच्या कामावरून कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील पाऊल उचलले आहे. कला अकादमीत काही दिवसांपूर्वी तियात्रावेळी छतातून पावसाच्‍या पाण्‍याची गळती लागली. त्‍यामुळे कला-संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्‍यक्ष गोविंद गावडे यांच्यावर सर्व थरांतून टीका झाली होती. परंतु गावडे यांनी हात वर करताना सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडे बोट दाखविले होते. दरम्‍यान, सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे या सरकारमधील दोन एसटी नेत्‍यांमधील संघर्ष पुन्‍हा एकदा उफाळून आला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्‍याचेही कानावर हात

साबांखा अभियंत्यांनी सांगितले की, आमच्याकडे सद्यःस्थितीतील अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाने मागितला आहे. परंतु कला अकादमीचे खुले व्यासपीठ कोसळल्यानंतर ज्या आयआयटीने तपासणी केली होती, तो अहवाल अद्याप आलेला नाही. गळतीनंतर जी पावले उचलणे आवश्‍‍यक होते, ती साबांखाने उचलली आहेत. कला अकादमी अजूनही कला-संस्कृती खात्याकडे सोपविण्यात आलेली नाही.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्या प्रमुखांकडे कला अकादमीच्‍या कामाचे सर्व अहवाल मागितले आहेत. कला अकादमीत जी-जी कामे झालेली आहेत, त्‍यांचा तसेच गळतीबाबतच्‍या कामाचा तपशीलही देण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: 55 व्या इफ्फीला Rockstar रणबीरची हजेरी!

Anjuna Music Event Protest: हणजूणमध्ये संगीत महोत्सवावरून स्थानिकांमध्येच जुंपली; भर सभेत तरुणाला धक्काबुक्की; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

SCROLL FOR NEXT