CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोमंतकीय वारकऱ्यांसाठी खूशखबर! सावंत सरकार पंढरपुरात बांधणार भक्तनिवास

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.

Manish Jadhav

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गोवा राज्यातून लाखो भाविक दरवर्षी आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने येतात. येथे येणाऱ्या गोव्यातील भाविकांसाठी आता गोवा सरकार भक्तनिवास बांधणार आहे.

यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर गोवा सरकार त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भक्तनिवास बांधेल.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री सावंत यांनी आज दिली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सर्व सामान्य लोकांना सुख शांती समृद्धी मिळू दे असे आपण विठुरायाला साकडे घातल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT