Anganwadi Worker

 

dainik gomantak

गोवा

मुख्यमंत्र्यांनी 'या' मागण्या केल्या मान्य, अंगणवाडी सेविकांच आंदोलन मागे

अंगणवाडी सेविकांना मारहाण करण्यास जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

आझाद मैदानावरील आंदोलक अंगणवाडी सेविकांनी आपल्या काही मागण्या यापूर्वीच मान्य केल्या असून उर्वरित मागण्या सोडविण्याची तयारीही सरकारने दर्शविल्याने त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी सेविकांचे नेते हृदयनाथ शिरोडकर म्हणाले की, त्यांनी आझाद मैदानावरील 9 दिवसांचे धरणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी (Government) प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी आम्ही रविवारी बैठक बोलावली आहे, असे ते म्हणाले. सेवानिवृत्ती लाभ मिळण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती, सेवेतील सातत्य आणि सेवानिवृत्ती लाभांमध्ये वाढ या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. पगार आणि पेन्शन (Pension) योजनेतील वाढीबाबत युनियन सरकारला नवीन प्रस्ताव सादर करेल, असेही ते म्हणाले.

“प्रथम आम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले की आमची अंगणवाडी सेविकांची गोवा (goa) युनियन कायदेशीर संघटना आहे आणि इतर युनियनची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सरकारशी संवाद साधत नसल्याबद्दल समाजकल्याण संचालकांच्या निलंबनाची मागणीही आम्ही केली आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच आंदोलकांना (Movement) मारहाण करण्यास जबाबदार असलेल्या पोलिसांवर (police) कारवाई करण्याची आम्ही मागणी केली आहे,”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT