Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Problem: सोनसडो येथे दुर्गंधीचे साम्राज्य; चिकनचा कचरा दोन दिवस तसाच पडून

Sonsodo Garbage Problem: मडगावातून गोळा केलेला चिकनचा कचरा मागचे दोन दिवस तीन वाहनांमध्‍ये भरून सोनसडो परिसरात रस्‍त्‍यावरच ठेवल्‍याने तेथे असह्य दुर्गंधी पसरली.

दैनिक गोमन्तक

Sonsodo Garbage Problem:

मडगावातून गोळा केलेला चिकनचा कचरा मागचे दोन दिवस तीन वाहनांमध्‍ये भरून सोनसडो परिसरात रस्‍त्‍यावरच ठेवल्‍याने तेथे असह्य दुर्गंधी पसरली. स्‍थानिकांनी पोलिसांना बोलावून ती वाहने ताब्‍यात घेण्‍याची मागणी केली.

त्‍यानंतर मडगाव पालिकेने हस्‍तक्षेप करून संबंधित कंत्राटदाराला सोनसडो परिसरातून ही वाहने दुसरीकडे हलविण्‍यास भाग पाडले. माजी नगराध्‍यक्ष बबिता प्रभुदेसाई यांनी याकडे प्रसारमाध्‍यमांचे लक्ष वेधले.

वास्‍तविक मडगाव पालिकेचे कर्मचारी रोज सोनसड्यावर येत असतात. असे असतानाही ही वाहने तेथेच कशी काय ठेवण्‍यात आली? असा सवाल करून कंत्राटदार आणि पालिकेच्‍या पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

एकूण तीन वाहनांत हा कचरा भरून ठेवण्‍यात आला होता. नंतर तो एका मोठ्या ट्रकमध्‍ये भरून कर्नाटकात नेण्‍यात येणार होता, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

मडगावातील चिकनचा कचरा गोळा करण्‍याची जबाबदारी एका कंत्राटदाराला देण्‍यात आली आहे. लहान वाहनांमध्‍ये हा कचरा भरून सोनसड्यावर आणला जायचा आणि नंतर एका मोठ्या ट्रकमधून तो कर्नाटकात पशूखाद्यासाठी वाहून नेला जायचा. मात्र हा कचरावाहू वाहन बंद पडल्‍याने आणि पर्यायी वाहन उपलब्‍ध न झाल्‍याने हा कचरा दोन दिवस तिथेच राहिला. त्‍यामुळे तो कुजला.
- गौरीश शंखवाळकर, मडगावचे मुख्‍याधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT