CK Nayudu Trophy Dainik Gomantak
गोवा

Colonel CK Naidu Trophy: गोव्याच्या युवक संघाचा पुन्हा डावाने पराभव, छत्तीसगडचा दणदणीत विजय

भिलाई येथील बीएसपी क्रिकेट स्टेडियमवर त्यांना छत्तीसगडने मंगळवारी अडीच दिवसांच्या खेळातच डाव व १६९ धावांनी हरविले.

किशोर पेटकर

Colonel CK Naidu Trophy: गोव्याच्या २३ वर्षांखालील युवक संघाची कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील पराभूत कामगिरी सलग दुसऱ्या सामन्यातही कायम राहिली. भिलाई येथील बीएसपी क्रिकेट स्टेडियमवर त्यांना छत्तीसगडने मंगळवारी अडीच दिवसांच्या खेळातच डाव व १६९ धावांनी हरविले.

गोव्याला स्पर्धेतील पहिल्या लढतीत कडापा येथे आंध्रने डाव व ५३ धावांनी नमविले होते. गोव्याचा ड गटातील तिसरा सामना २१ जानेवारीपासून सांगे येथे केरळविरुद्ध खेळला जाईल.

२९९ धावांच्या पिछाडीवरून गोव्याचा दुसरा डाव १३० धावांत संपुष्टात आला. सलामीचा अभिनव तेजराणा (४५) व सर्वांत शेवटी बाद झालेला योगेश कवठणकर (४८) यांचा अपवाद वगळता गोव्याच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: १०३

छत्तीसगड, पहिला डाव: ९ बाद ४०२ घोषित

गोवा, दुसरा डाव (१ बाद २३ वरुन): ५३.२ षटकांत सर्वबाद १३० (अभिनव तेजराणा ४५, मनीष काकोडे ९, राहुल मेहता ७, योगेश कवठणकर ४८, आयुष वेर्लेकर ४, शिवेंद्र भुजबळ २, दीप कसवणकर ०, लखमेश पावणे ०, फरदीन खान ५, शुभम तारी नाबाद २, सत्यम दुबे १-३२, वरुणसिंग भुई ३-२८, अरिन द्विवेदी ५-२९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT