Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised Dainik Gomantak
गोवा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: दारूच्या नशेत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना!तिघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Kavya Powar

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised: करासवाडा-म्हापसा येथील आयडीसीच्या (थिवी औद्योगिक वसाहत) मुख्य गेटसमोरील रस्त्यालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना काल (सोमवारी) सकाळी उघडकीस आली. त्यानंतर शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले असून आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.

याबाबत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दारूच्या नशेत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना!

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी नायजेल फॉन्सेका (41, आकय), आलेक्स फर्नांडिस (51, आकय), लॉरेन्स मेंडीस (40, थिवी) या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

माहितीनुसार, या तिघांनी कथित दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काल शिवप्रेमींनी संयम बाळगून तसेच एकतेचे प्रतीक दाखवत संध्याकाळी सिंहासनाधिष्ठीत नवीन पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. ख्रिस्‍तीधर्मीय आमदार कार्लुस फेरेरा यांनी शिवरायांच्‍या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करून दुग्‍धाभिषेकही केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT