Turf  Canva
गोवा

Bicholim News: छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा होणार कायापालट! 'कृत्रिम टर्फ'च्या निर्णयाचे खेळाडूंकडून स्वागत

Chatrapati Shivaji Maharaj Ground Bicholim: आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत तसा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. मैदानाचा विकास करुन कृत्रिम टर्फ बसविण्यास उपस्थित सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Chatrapati Shivaji Maharaj Ground Bicholim

डिचोली: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला आता नवी झळाळी मिळणार आहे. या मैदानाचा विस्तार करतानाच, मैदानावर ''कृत्रिम टर्फ'' बसविण्यात येणार आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत तसा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. मैदानाचा विकास करुन कृत्रिम टर्फ बसविण्यास उपस्थित सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. पालिकेच्या या निर्णयाचे बैठकीवेळी उपस्थित असलेल्या खेळाडूंनीही समर्थन केले.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या विषयावर मंगळवारी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची खास बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. शेट्ये यांच्यासह जी-सुडाचे अधिकारी श्री. मुजावर तसेच उपनगराध्यक्ष दीपा पळ यांच्यासह सतीश गावकर, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, रियाज बेग, अनिकेत चणेकर, तनुजा गावकर, ऍड. अपर्णा फोगेरी, अॅड. रंजना वायंगणकर, दीपा शिरगावकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे खेळाडूंसाठी वरदान असले, तरी ते गैरसोयीचे आहे. दहा वर्षांपूर्वी नैसर्गिक हिरवळ घालण्यात आली होती. देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मैदानाची वाईट स्थिती झाली आहे.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा विकास ही काळाची गरज आहे. पालिका मंडळाच्या निर्णयानुसार आता या मैदानाचा कायापालट करण्यात येणार आहे. मालकी हक्कावरून मैदानासंबंधी वाद किंवा अन्य तांत्रिक अडचणी असल्यास, त्या जाग्यावर घालून मैदानाचा विकास करण्यात येणार आहे. कृत्रिम टर्फ बसविल्यानंतर जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध येणार आहे. मैदानाची देखभाल होण्यासही मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT