Chargesheet filed in anti railway road duplication case  Dainik Gomantak
गोवा

रेल्वे मार्ग विरोध प्रकरणी आरोपपत्र दाखल, आंदोलक ठाम

कितीही खटले दाखल झाले तरी पर्यावरणासाठी लढणार; आंदोलक ठाम

दैनिक गोमन्तक

सासष्टी : कोकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत चांदर येथील रेल्वेमार्ग दुपदरीकरण कामाच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी चार जणांवर मडगावच्या (Margao) प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयातून बाहेर आल्यानंतर आंदोलक अभिजीत प्रभुदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आमची भूमी पुढील पिढीसाठी सांभाळून ठेवण्यासाठी हा लढा असून या पुढेही तो चालूच राहील. असे कितीही खटले दाखल केले तरी आमचा निर्धार कायम राहील. यावेळी या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पर्यावरण (environment) चळवळीतील सुमारे 100 कार्यकर्ते न्यायालयाबाहेर (court) जमा झाले होते. त्यात आमदार क्रुझ सिल्वा आणि युरी आलेमाव यांचाही समावेश होता.

आरोपपत्र दाखल झालेल्या चार आंदोलकांमध्ये अभिजीत प्रभुदेसाई, डायना तावारिस, फ्रेडी त्रावासो आणि विकास भगत यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 15 जून रोजी ठेवली आहे. त्यादिवशी या चौघांवरील आरोपपत्रातील मजकूर स्पष्ट केला जाईल, अशी माहिती आंदोलकांचे वकील स्टॅनली रॉड्रिग्स यांनी दिली.

चांदर येथील घटना 1 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती. तेव्हा हजारो आंदोलक रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधात रेल्वे मार्गावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे मालवाहू रेल्वे व प्रवासी वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली होती. वास्को रेल्वे स्टेशनचे रेल्वे पोलिस (Police) निरीक्षक रोहित दीक्षित यांनी या आंदोलकांवर तक्रार दाखल केली होती. आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले की याविषयी आम्ही लोकांसोबत आहोत आणि या सर्व योजनांना आमचा विरोधच असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT