Panaji Court Dainik Gomantak
गोवा

Panaji Court News: 61 व्या वर्षी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; 87 व्या वर्षी झाली निर्दोष मुक्तता

पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, मडकईतील प्रकरण

Akshay Nirmale

Panaji Court News: पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 सप्टेंबर 1997 रोजी झालेल्या हत्येच्या कथित प्रयत्नाचा आरोप असलेल्या काशिनाथ नाईक याची शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली आहे. फोंडा पोलिसांत याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 26 वर्षानंतर ही निर्दोष मुक्तता झाली आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा संशयित आरोपी 61 वर्षांचा होता तर आता निर्दोष मुक्ततेवेळी त्यांचे वय 87 वर्षे आहे.

मडकई येथील महालवाड्डो येथे काशिनाथ नाईक व त्याचे तीन भाऊ रंगनाथ नाईक, नीलकांत नाईक व गोविंद नाईक यांचे वडिलोपार्जित घर आहे.

5 सप्टेंबर 1997 रोजी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला नीलकांत आणि दुसरा भाऊ तक्रारदार रंगनाथ हे गणेश चतुर्थीच्या उत्सवाची तयारी करत होते. काशिनाथ याने गणेशमुर्ती ठेवलेल्या खोलीत सुमारे 10 ते 15 गोण्या भात ठेवला होता.

नीलकांत यांने काशिनाथला ते काढण्यास सांगुनही काशिनाथने ते काढले नाही. त्यामुळे नीलकांत याने स्वत: ते काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी काशिनाथने चाकूने नीलकांतच्या पोटावर वार करून पळ काढला, असे तक्रारीत म्हटले होते.

12 जून 1998 रोजी या आरोपपत्र दाखल झाले. 19 वर्षांनंतर 2 ऑगस्ट 2017 रोजी आरोप निश्चित केले गेले. ट्रायल कोर्टाने आरोपी काशिनाथ नाईकची निर्दोष मुक्तता करताना निकालात म्हटले आहे की, रेकॉर्डवरील पुरावे कुटुंबातील तीन सदस्यांपुरते मर्यादित आहेत.

तिघांपैकी दोघे प्रत्यक्षदर्शी नाहीत. एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्याचा पुरावा विरोधाभासी, अतिशयोक्तपूर्ण आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार मिळत नाही, जखम सिद्ध होत नाही. त्यामुळे काशिनाथ नाईक (वय 87 वर्षे) याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT