Noise Pollution  Gomantak Digital Team
गोवा

Noise Pollution In Goa: ध्वनिप्रदूषणाविरुद्ध चार्जशीट दाखल, हणजूण- वागातोर भागातील घटना

पोलिसांकडून कारवाई : हणजूण तसेच वागातोरच्या किनारी भागातील नागरिकांकडून तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Noise pollution हणजूण तसेच वागातोरच्या किनारी भागात ध्वनिप्रदूषण करून स्थानिकांची झोपमोड करणाऱ्या वागातोर येथील कॉफे-ला म्युझिका आणि हणजूण येथील सॉसो या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाविरोधात हणजूण पोलिसांकडून रितसर चार्जशीट दाखल करून घेण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याचा भंग करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या अनेकांचे धाबे सध्या दणाणले आहे.

दरम्यान, 12 जानेवारी 2023 रोजी हणजूण पंचायतीचे तलाठी असलेल्या गौरीश नाईक यांच्याकडून वागातोर येथील कॉफे-ला म्युझिका आणि हणजूण येथील सॉसो बार ॲण्ड रेस्टॉरंटच्या विरोधात कायद्याचे उल्लंघन करीत रात्री उशिरापर्यंत जोरात संगीत वाजवून परिसरात ध्वनिप्रदूषण करत असल्याची रितसर तक्रार राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कार्यालयात दाखल करण्यात आली होती.

तथापि, संबंधित बोर्डाच्या अहवालानुसार, म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करताना हणजूण पोलिसांकडून तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या कॉफे- ला म्युझिका रेस्टॉरंट यांच्या ताब्यातील म्युझिक सिस्टीम पोलिसांकडून जप्त करण्यात आली.

यावेळी संशयित विजय अरौरा तसेच सुदीप्ता घोष (दोघेही कॉफे-ला म्युझिकाचे मालक तसेच व्यवस्थापक) यांना राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणांवरून ताब्यात घेण्यात आले.

दुसऱ्या घटनेत हणजूण पोलिसांकडून सॉसो बार व रेस्टॉरंटचे मालक तसेच व्यवस्थापक असलेल्या संशयित दीपांश सुभाष बजाज, मोहक सुभाष बजाज आणि सुरेश जयचंद रामोला यांच्या विरोधात ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून कायदेशीर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT