Madgaon Traffic Dainik gomantak
गोवा

मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मडगावात वाहतुकीत बदल

मतमोजणी झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोंब मडगाव येथे असलेल्या विद्या विकास मंडळाच्या प्रकल्पात विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या परिसरात गर्दी टाळण्यासाठी येथील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सामान्य व्यक्तींना मतमोजणी पर्यंत या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश बंद असेल. केवळ मतमोजणीसाठी नेमलेले सरकारी कर्मचारी, पोलिंग एजंट आणि उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना दिली.

वाहतुकीच्या (Traffic) नियमात गुरुवारी 10 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून बदल होणार आहे. यावेळी या ठिकाणी एकंदरीत 107 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पूर्ण मतमोजणी झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे आंगले यांनी सांगितले.

यात खारेबंद पासून पेडा, रेल्वे फाटक मार्गे येणारी आणि जाणारी वाहतूक तात्पुरती ओव्हरब्रीज वरुन वळवण्यात आली आहे. या पुलावर सध्या सुरु असलेले दुरुस्तीचे काम एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील कामाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे.

मात्र निवडणुकीच्या (Goa Election) दिवशी विद्या विकास मंडळाच्या परिसरातील रहिवाशांना तसेच शालेय कर्मचारी आणि मुलांना ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देण्यात येणार आहे. या मतमोजणीच्या ठिकाणी सरकारी कर्मचारी, पोलिंग एजंट, उमेदवार यांच्या वाहनांना पार्किंगची सोय करण्यात आली असून त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्र नुसार नेमलेल्या ठिकाणी आपली वाहने पार्क करण्यासाठी मिळणार आहेत. तसेच कोंब परिसरात प्रमुख रस्ते, रेल्वे फाटक, रेल्वे भूमिगत मार्ग, खारेबांध मार्ग या ठिकाणीच्या रस्त्यावर वाहने पार्क करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे .

ओल्ड मार्केटपासून कोंब या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ता त्यादिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बरोबरच याठिकाणी अनेक बदल करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांना (Police) सहकार्य करावे, असं आवाहन दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT