CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panaji News : खासगी नोकऱ्यांसाठी रोजगार धोरणात बदल करू : मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

Panaji News : स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य मिळायलाच हवे

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, खासगी क्षेत्रामध्ये गोमंतकीयांना कायमस्वरूपी नोकऱ्या आणि नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी आवश्यक ते बदल रोजगार धोरणात राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकारांना सांगितले.

औषध निर्मिती कंपन्या राज्याबाहेर कामगार भरती करत असल्यावरून गेले दोन - तीन दिवस वाद सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी वरील निवेदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यातील तरुण - तरुणींना रोजगारात प्राधान्य मिळाले पाहिजे हे सरकारचे धोरण आहे. या भूमीचे कायदे व नियम सर्वांना पाळावे लागतील. रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात व कामगार आयुक्त डॉ. लेविनसन मार्टिन्स यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाणार आहे.

सध्या असलेल्या कायद्यांचे व नियमांचे पालन होते की नाही हेही आधी पाहिले जाणार आहे. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास कायदा दुरुस्ती, नियम दुरुस्ती, धोरण दुरुस्ती सरकार करेल.

मुख्यमंत्री म्हणाले, दोन-तीन कंपन्यांनी राज्याबाहेर कामगार भरतीसाठी मुलाखती आयोजित केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कामगार आयुक्त त्या त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलले. त्या कंपन्यांनी या मुलाखती आता रद्द केलेल्या आहेत. यापुढे अशी गोष्ट घडू देणार नाही. कंपन्यांना येथील मनुष्यबळालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यांनी जाहिरातही येथे करावी आणि मुलाखतही येथेच घ्यावी आणि कामगारांची निवडही येथूनच करावी. यासाठी रोजगार धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी कामगार आयुक्तांना अभ्यास करण्यास सांगितले आहे.

‘दिल्लीला जाण्यात स्वारस्य नाही’

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कोपरा सभा घेण्यासाठी तीन दिवसांकरिता आपण दिल्लीत होतो. त्यामुळे आपल्याला दिल्लीत (राजकीय बस्तान बसविण्यास) जायचे नाही, गोव्यातील जनतेची आणखी काही वर्षे सेवा करायची आहे.

येथील जनतेची सेवा करण्याची मोठी संधी जनतेने आणि देवाने आपल्याला दिली आहे, असे सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पक्षीय राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT