Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality : म्हापसा पालिकेत सत्तापरिवर्तन;नगराध्यक्षांचा राजीनामा

Mapusa Municipality : सत्ताधारी गटातील अंतर्गत करार

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Municipality : म्हापसा पालिकेत सत्तापरिवर्तन झाले असून, विद्यमान नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला.

यासंदर्भात सत्ताधारी गटातील नगरसेवकांची बुधवारी (ता.७) सायंकाळी सचिवालयात उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली होती आणि आमदारांच्या सूचनेनुसार मिशाळ या पदावरून पायउतार झाल्या.

या बैठकीस सत्ताधारी गटातील १४ पैकी ११ नगरसेवक हजर होते. एकूण वीस नगरसेवकांचे हे पालिका मंडळ आहे. प्रिया मिशाळ यांना आमदार जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार सोडण्याची सूचना केली. तसेच, बैठकीत पुढील नवीन चेहरे कोण असतील याबाबत सत्ताधारी गटास माहिती दिली गेली, अशी पालिकेतील सूत्रांनी माहिती दिली.

प्रिया मिशाळ यांच्या जागी आता नवीन नगराध्यक्षा म्हणून डॉ. नूतन बिचोलकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या कार्यकाळात म्हापसा पालिकेचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे, तर उपनगराध्यक्ष म्हणून सुशांत हरमलकर हे येत्या काही दिवसांत जबाबदारी स्वीकारतील.

दरम्यान, नूतन बिचोलकर यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विराज फडकेदेखील आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, सध्या म्हापसा पालिका मंडळावर भाजपप्रणित आघाडीचे वर्चस्व आहे. या सत्ताधारी गटात अंतर्गत करार झाला असून, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे प्रत्येक वर्षभरासाठी आपापसात विभागून घेतली जाणार आहेत.

नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांचा कार्यकाळ हा गेल्या ३१ जानेवारी २०२४मध्ये संपुष्टात आलेला. त्यानुसार मिशाळ यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी पालिका संचालकांकडे सादर केला. तर विराज फडके यांचा उपनगराध्यक्ष म्हणून कार्यकाळ येत्या १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT