Flag Hoisting Dainik Gomantak
गोवा

Flag Hoisting मंत्र्यांसाठी ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळेत बदल!

म्हापशातील प्रकार : स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली नाराजी

दैनिक गोमन्तक

Flag Hoisting शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन ठिकाणी महत्त्वाचे प्रशासकीय कार्यक्रम होतात. एक अतिरिक्त जिल्हाधिकारी सरकारी संकुलात, तर दुसरा हुतात्मा चौकात म्हापसा पालिका मंडळ, उपजिल्हाधिकारी व स्वातंत्र्यसैनिक मिळून साजरा करण्याची पद्धत आहे.

मात्र, यंदा पहिल्यादा सरकारी संकुलातील सकाळी 8.05 वा. होणारा ध्वजारोहण सकाळी 9.15 वा. होणार आहे. ध्वजारोहणासाठी येणाऱ्या मंत्र्यांना लवकर येणे शक्य नसल्यामुळे हा वेळेत बदल करून ही प्रथा मोडली आहे.

हुतात्मा चौकात होणारा ध्वजारोहण प्रथेनुसार सकाळी 9 वा. होतो. मात्र, यंदा पालिकेने सुद्धा मंत्र्यांच्या इच्छेपोटी आपला कार्यक्रम सकाळी 9 ऐवजी सकाळी 8.30 वा. करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

1962 पासून हुतात्मा चौकात सकाळी ९ वा. ध्वजारोहण करण्याची पद्धत आहे. पण, विद्यमान पालिकेने नागरिकांना विश्वासात न घेता मंत्र्यांच्या दबावाला बळी पडून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा बदलल्याचे बोलले जात आहे.

मंत्र्यांनी किंवा महनीय व्यक्तींना देशाचा ध्वज फडकावण्याची संधी लाभते,हे त्यांचे भाग्यच असते.त्यामुळे कुणाही महनीय वा अतिमहनीय व्यक्तीने अशा तऱ्हेने स्वतःला वाटेल तेव्हा ध्वजारोहण करू, असे ठरवू नये,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

2005 पासूनच्या परंपरेत खंड

सन 2005 पासून, सरकारी संकुलात शासकीय पातळीवर ध्वजारोहण करण्याची पद्धत सुरू झाली. तेव्हापासून सकाळी 8.05 मिनिटाने ध्वजारोहण बार्देशमधील मंत्रीमहोदय करत असत. मागच्या 19 वर्षामध्ये प्रथा सांभळण्यात आली. मात्र यंदा अतिमहनीय व्यक्तींना ही वेळ म्हणजे खूप सकाळ वाटत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वेळेत बदल करुन म्हापसाच्या जनतेवर आपला निर्णय थोपवला आहे, असे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT