Railway  Dainik Gomantak
गोवा

रेल्वेच्या वेळापत्रकात 6 मार्चपासून बदल

प्रवाशांनी बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: 6 मार्च ते 21 मार्च 2022 दरम्यान करमळी ते वेर्णा रेल्वे मार्गावर 63 मीटर ओपन वेब गर्डरचे काम केले जाणार आहे. या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे, असे कोकण रेल्वे (Konkan Railway) अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. हे काम हातात घेतले जाणार असल्याने प्रवासी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.

गाडी क्र 12051 ही मुंबई सीएसएमटी ते मडगाव (Margao) जनशताब्दी एक्स्प्रेस प्रवासी गाडी 8 मार्चपासून प्रवास थिवी स्थानकापर्यंत असेल. 12052 या क्रमांकाची मडगाव-मुंबई सीएसएमटी ही रेल्वे 8 मार्चपासून थिवी स्थानकावरुन सुटेल. 12618 या क्रमांकाची रेल्वे एच निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्स्प्रेस प्रवास 7 मार्चपासून करमळी येथे 30 मिनिटांसाठी नियमित असेल. रेल्वे क्र. 12051 मुंबई सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा 14 मार्च पासूनचा प्रवास करमळी येथे 15 मिनिटांसाठी नियमित केला आहे. रेल्वे क्र. 12051 मुंबई (Mumbai) सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास 21 मार्च रोजी करमळी येथे 15 मिनिटांसाठी नियमित केला जाणार असून, प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

SCROLL FOR NEXT