मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून 2021 साठीचा सन्मान स्वीकारताना श्री चंद्रकांत गवस  Dainik Gomantak
गोवा

चंद्रकांत गवस यांना सहकार क्षेत्रातील "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून केले सन्मानित

सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी सर्वोत्कृष्ट सहकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा राज्य सहकारी संघ लि. पणजी यांनी सहकार विभाग, गोवा सरकार (Government of Goa) आणि राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 68 वा सहकार सप्ताह साजरा केला. वास्कोतील उद्योजक तथा लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस (Chandrakant Gavas) यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

"सहकार सप्ताह" च्या समारोप कार्यक्रमाचे औचित्य साधून द गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि. "सहकार संकुल" 6 व्या मजल्यावरील पाट्टो पणजी येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यात वास्कोतील उद्योजक तथा गोवा चेंबर आणि वाणिज्य आणि उद्योग, खजिनदार आणि लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस,यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून नाबार्ड गोव्याच्या महाव्यवस्थापक श्रीमती उषा रमेश व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

गोवा चेंबर आणि वाणिज्य आणि उद्योगासाठी (industry) ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे की आमचे खजिनदार आणि लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत के गावस यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या अफाट सेवेबद्दल 2021 साठी "सर्वोत्कृष्ट सहकारी" म्हणून सन्मानित करण्यात आले असल्याचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT