Goan Youth killed in America Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय तरुणाच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी अमेरिकेत 5 हजार डॉलरचं बक्षीस

ह्यूस्टन पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु, न्याय मिळवून देण्याची ग्वाही

दैनिक गोमन्तक

पणजी : टेक्सास प्रांतातील ह्युस्टनमध्ये गोव्यातील चांदर गावातील तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोवा सरकारने त्याचं पार्थिव परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील पोलिसांनी जॉन डायस या गोमंतकीय तरुणाच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्याला 5 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

गोव्यातील एनआरआय कमिशन अमेरिकेतील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. चांदर येथील तरुण जॉन डायसच्या मृतदेहाला परत मिळवण्यासाठी गोवा सरकारसह एनआरआय कमिशनचे प्रयत्न सुरुच आहेत. आता अमेरिकेतील पोलिसांनीही जॉनच्या हत्येचा (Murder) छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एक मास्कधारी व्यक्ती बराच वेळ जॉन काम करत असलेल्या गॅस स्टेशनच्या बाहेर घुटमळत होता. काळ्या रंगाचे कपडे आणि हुडी घातलेल्या व्यक्तीने अचानक दुकानात प्रवेश केला आणि काऊंटरवर असलेल्या जॉनवर गोळ्या झाडल्या. जॉनची हत्या करुन मास्कधारी व्यक्ती दुकानातून पळून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचंही अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

दरम्यान गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जॉन डायसच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला आहे. ह्युस्टनमधील पोलिसांनीही (Police) डायस कुटुंबाला आश्वस्त केलं आहे की ह्युस्टन त्यांच्यासोबत आहे आणि जॉनला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत कामाच्या निमित्ताने गेलेल्या चांदरमधील तरुणाला ह्युस्टनमध्ये गोळी झाडून हत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जॉन हा एक चांगला फुटबॉलपटू होता. दक्षिण गोव्यातील चांदर आणि गिरदोली येथील क्लबसाठी तो पूर्वी गोलकिपिंग करायचा. मात्र रोजगाराच्या पोटी तो तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत (America) गेला होता. तिथेच त्याच्यावर हा आघात झाला. जॉनच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चांदर गावावर शोककळा पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT