Chandigarh councillors to visit Goa 
गोवा

25 लाख रूपये खर्च करून चंदीगडचे नगरसेवक गोव्यात का येत आहेत? आम आदमी पक्षाचा बहिष्कार

चंदीगडच्या नगरसेवकांची गोव्याच्या दौऱ्यावर येण्याची तयारी सुरू आहे.

Pramod Yadav

Chandigarh councillors to visit Goa: चंदीगडच्या नगरसेवकांची गोव्याच्या दौऱ्यावर येण्याची तयारी सुरू आहे. एकूण 25 लाख रुपये खर्च करून या नगरसेवकांना गोव्यात आणले जात आहे. नगरसेवकांचा हा अभ्यास दौरा असला तरी, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी या दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे. पण, एवढा खर्च करून चंदीगडचे नगरसेवक गोव्यात का येत आहेत.

नगरसेवकांची पहिली टीम मंगळवारी गोव्यात येणार असून, सर्वजण 01 जुलैला माघारी परतणार असल्याची माहिती आता मिळाली आहे. याशिवाय दादू माजऱ्यातील काही लोकांनाही नंतर गोव्यात पाठवण्याची तयारी सुरू आहे.

आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला त्यांचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याने, त्यांनी दौऱ्यावर जाण्यास नकार दर्शवला आहे.

गोव्यात का येत आहेत नगरसेवक?

चंदीगडमधील दादू माजरा येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पाचे तंत्रज्ञान योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी नगरसेवकांना गोव्याच्या दौऱ्यावर नेण्याची तयारी सुरू आहे.

कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा वाद काय?

चंदीगडमधील दादू माजरा येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाचा पर्यावरणावर वाईट परिणाम होईल, अशी भीती काही पक्षाच्या नगरसेवकांना वाट असल्याने ते हा प्रकल्प उभारण्यास नकार देत आहेत. हीच शंका दूर करण्यासाठी या सर्व नगरसेवक गोव्यात येत आहेत. यासाठी एकूण 25 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी महिनाभरापूर्वीच कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता. या प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने यापूर्वीच मान्यता दिली होती, असा युक्तिवादही त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT