Court
Court Dainik Gomantak
गोवा

Margao: चांदर रस्ता रोको प्रकरण; संशयितांवर आरोप निश्चिती की मुक्तता? 'या' तारखेला होणार निवाडा

सुशांत कुंकळयेकर

रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी एकत्र जमून चंदर येथील रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलेल्या अभिजित प्रभुदेसाई व अन्य 09 आंदोलकांवर खटला चालवावा की आरोप निश्चिती पूर्वीच त्यांना निर्दोष मुक्त करावे, याबाबत मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा पारकर 07 जूनला निवाडा देणार आहेत.

एक नोव्हेंबर 2020 रोजी बेकायदेशीर जमाव जमवून चांदर येथील रस्ता अडविण्याचा आरोप मायणा कुडतरी पोलिसांनी या आंदोलकांवर ठेवला आहे. त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश जारी केला होता.

त्यामुळे बंद केलेला रस्ता दुसऱ्यांदा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा संशयितांच्या वतीने करण्यात आला असून त्यामूळे आरोप निश्चितीपूर्वीच हा खटला रद्दबातल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

आज या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून आता 07 जूनला निवाडा देण्यात येणार आहे. रेल्वे मार्ग विस्तारासह तिन्ही रेखीय प्रकल्पाला विरोध करणाऱ्या हजारो आंदोलकांनी 01 नोव्हेंबर 2020 रोजी चांदर रेल्वे फाटकावर जमून रेल्वे मार्ग अडविला होता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तसेच मायणा कुडतरी पोलिसांनी दोन वेगवेगळे खटले आंदोलकांवर घातले आहेत.

या संशयितांच्या दाव्याला सरकारी वकिलाकडून विरोध करण्यात आला असून या प्रकरणी संशयीत त्या दिवशी त्या ठिकाणीं उपस्थीत होते हे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. एवढा पुरावा आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत असा दावा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Today's Live Update: मांगोर येथे घरफोडी; 2.5 लाखांचे दागिने, रोकड लंपास

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Kotak Mahindra Bank: RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेला ग्रहण, दोनच दिवसात गमावले 47 हजार कोटी; शेअर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण

SCROLL FOR NEXT