Chandel Bridge : Dainik Gomantak
गोवा

Chandel Bridge : चांदेल येथील मिनी पूल धोकादायक

Chandel Bridge : त्वरित दुरुस्त करा : आमदार आर्लेकरांनी लक्ष देण्याची गट काँग्रेसची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Chandel Bridge : मोरजी, चांदेल पाणी प्रकल्पाच्या जवळ मुख्य रस्त्यावर कमकुवत असलेला मिनी पुलाकडे स्थानिक आमदाराने दुर्लक्ष केल्याचा दावा काँग्रेसचे ॲड. जितेंद्र गावकर यांनी केला.

पेडणे गट काँग्रेसतर्फे नुकतीच या पुलाची पाहणी केली. यावेळी गट अध्यक्ष कृष्णा नाईक, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मारुलकर, उदय महाले आदी उपस्थित होते.

भला मोठा खड्डा पडल्याने हा पूल खचलेला आहे. हा पूल जर कोसळला तर वाहतूक बंद होऊन चार गावांचा संपर्क तुटणार आहे. याशिवाय दुसरा पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे सरकारने हा मिनी पूल त्वरित दुरुस्त करावा किंवा या ठिकाणी नवीन पूल उभारावा, अशी मागणी केली.

गावकर यांनी सांगितले की, आमदार आर्लेकर या रस्त्यावरून अनेक वेळा गेले असतील, परंतु त्यांना अजून हा खचलेला पूल दिसलेला नाही. हसापूर येथे अरुंद पुलाच्या जागी नवा रुंद पूल बांधण्यात येत आहे. दोडामार्ग बाजूने मोपा विमानतळावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी हा पूल बांधला जात आहे. यासाठी अनेकांची घरे, दुकाने हटविली जातील. सरपंच तुळशीदास गावस यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे, असे ते म्हणाले.

कासारवर्णे बैलपार ते चांदेल रस्ता खराब

बैलपार ते चांदेलपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झालेली असून याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न जितेंद्र गावकर यांनी उपस्थित केला. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दीड महिन्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार आर्लेकर यांच्या हस्ते झाला, मात्र हे काम अजून हातात घेण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT