possibility of rain
possibility of rain  
गोवा

पावसाची शक्‍यता

Dainik Gomantak

पणजी, 
गोवा हवामान खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्‍याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच गोवा किनारपट्‍टीच्‍या नैऋत्य दिशेला होणार्‍या हवामानातील बदलांमुळेही हा कमी दाबाच्‍या पट्‍ट्याची निर्मिती होत आहे. यामुळे येत्‍या पाच दिवसात जोरदार वादळासह पावसाची शक्‍यता आहे. तसेच समुद्रकिनारी प्रतितास ४५ ते ५५ किमी असल्‍याने २७ मे ते ३० मे या कालावधीत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा गोवा वेधशाळेने दिला आहे.   
गेल्‍या चोवीस तासात राज्‍यात सरासरी कमाल ३५. ६ अंश सेल्‍सिअस तर किमान २७ अंश सेल्‍सिअस तापमानाची नोंद झाली आहे. काही दिवसांपुर्वीच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान चक्रिवादळाचा वाईट प्रभाव देशातील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांवर दिसून आला. भारतीय हवामान खात्याच्या अरबी समुद्र किनारी भागातील सर्व हवामान केंद्रांकडून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. जनतेला योग्‍य त्‍या वेळी योग्‍य माहिती देण्‍यात येणार असल्‍याची माहितीही हवामान खात्‍याने दिली आहे. 
अरबी समुद्रातील ज्या दक्षीण मध्य भागात ही प्रक्रिया होत आहे, त्या भागाला सर्वात जवळची वेधशाळा असलेली भारतीय हवामान खात्याच्या तिरूअनंतपुरम केंद्राने स्थानिक मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच 31 मे नंतर समुद्रात उतरू नये, असेही सांगितले आहे. मान्सूनच्या सुरूवातीला व मान्सून संपण्याच्या मार्गावर असताना चक्रिवादळ होणे ही  प्रक्रिया स्वाभाविक आहे. ही वादळे काही तीव्र तर काही कमी तीव्रतेची असतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT