Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; असनी चक्रीवादळाचा परिणाम : IMD

Goa Rain Update : 11 मे ते 13 मे पर्यंत गोव्यात ठीकठिकाणी मेघगर्जनेच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितल्याप्रमाणे सुमारे 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update : मागील महिन्यापासून गोव्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले आहे. काल मंगळवारी (10 मे) ढगाळ वातावरण दिसून आले. त्यातच असह्य उष्णतेमुळे गोवेकर हैराण झाले आहेत. 11 मे ते 13 मे पर्यंत गोव्यात ठीकठिकाणी मेघगर्जनेच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितल्याप्रमाणे सुमारे 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरावर असनी चक्रीवादळाच्या आफ्टर इफेक्ट वातावरणात बदल झाल्याचे IMD ने सांगितले आहे. 'असनी चक्रीवादळामुळे, वारे खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वाहतात, ज्यामुळे गोव्यात आर्द्रतेचा प्रवेश होतो, आणि म्हणूनच राज्याच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे वारे सध्या 20 किमी प्रतितास वेगाने वाहत आहेत', असे आयएमडीचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी सांगितले.

गोव्यावर असनीचा कोणताही थेट परिणाम किंवा तीव्र हवामानाचा परिणाम होणार नाही, असे याआधी म्हटले जात होते. परंतु, IMD ने म्हटले आहे की असनीची उपस्थिती आणि हालचालींमुळे गोव्यासह देशाच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर हलका पाऊस पडू शकतो. हवामानाच्या परिस्थितीमुळे कमाल तापमानातही घसरण झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पणजीतील कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT