Chain Snatching | Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : युवतीला अडवून दीड लाखांची सोन्याची चेन पळवली

गोव्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : गोव्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फोंडा तालुक्यात काल गुरुवारी तीन चोऱ्या नोंद झाल्यानंतर आता कुर्टीमधूनही चेनचोरीचा प्रकार समोर आला आहे. कुर्टी फोंडा येथून आपल्या दुचाकीवरून येणाऱ्या एका युवतीची सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी अन्य दुचाकीवरून आलेल्यांनी पळवली असल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.

फोंड्यातील कुर्टी परिसरात ही घटना काल गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. रस्त्यावरुन जात असलेल्या या युवतीला अडवून त्या दोन्ही चोरट्या दुचाकीस्वारांनी खाली पाडले व गळ्यातील सोनसाखळी खेचून पळून गेले. पोलिसांत याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच दिवसात झालेल्या चोऱ्यांचा तपास करण्याचं मोठं आव्हान फोंडा पोलिसांसमोर आहे.

दरम्यान तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली.

दुसरीकडे कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला. अखेर दुकानदाराने आरडाओरडा केल्याने आपल्या दुचाकी तिथेच सोडून चोरट्यांनी पोबारा केला. तर खांडोळ्यातील प्राचीन गणेश मंदिरावर मध्यरात्री दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मूर्तीची प्रभावळ, मुकुट, हात, एका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्यही घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेत अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT