Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : गोव्यातील खाणपट्टे लिलावाला केंद्राकडून प्राधान्य मिळणार

राज्यातील खाणी सुरू होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining : राज्यातील खाणी सुरू होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या खाणींचा लिलाव करण्यासाठी केंद्राकडून प्राधान्यक्रमाने परवानगी दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. हैदराबाद येथे खाणमंत्र्यांची परिषद सुरू असून त्यात गोव्यातून सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील खाणी लवकर सुरू करण्याची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने त्याची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात काही राज्यातील नवीन खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात येणार असून त्यासंदर्भातचे सोपस्कार खाण खात्याला करण्याचे निर्देश यापूर्वीच खाणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

फायलीवर त्वरित निर्णय

राज्यामध्ये ज्या ठिकाणच्या खाणींचा लिलाव करायचा आहे, त्या निश्‍चित करण्यात याव्यात व त्यानंतर त्याच्या माहितीची फाईल खाण मंत्रालयाकडे सरकारने एका महिन्यात पाठवावी. त्यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

आता लक्ष न्यायालयाच्या निवाड्याकडे

राज्य सरकारने गेल्या मे महिन्यात राज्यातील सर्व खाणमालकांना त्यांच्या खाणपट्ट्यांच्या क्षेत्रातील यंत्रसामग्री हलवण्याचा आदेश दिल्यानंतर सुमारे 35 हून अधिक खाण कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्या आदेशाला आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकांवरील एकत्रित सुनावणी उच्च न्यायालयात पूर्ण झाली असून त्याचा निवाडा राखून ठेवण्यात आला आहे. सरकारने खाणपट्ट्यांच्या लिलावासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असली तरी उच्च न्यायालय काय निवाडा देते याकडे सरकारचे तसेच खाण कंपन्यांचेही लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT