Tax Devolution To Goa Dainik Gomantak
गोवा

Tax Devolution To Goa: गोव्याला 457 कोटी; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना कर हस्तांतरण करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

3rd instalment of tax devolution : केंद्र सरकारने आज राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण रक्कम वितरीत केली. यात गोव्याला 457 कोटी रूपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले आहे. तर महाराष्‍ट्राला 7,472 कोटी रूपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले.

59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी 1,18,280 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण करण्यात येते. 

कोणाली किती रक्कम (कोटी रुपये)
उत्तर प्रदेश - 21, 218, बिहार - 11, 897, मध्‍य प्रदेश- 9, 285, पश्चिम बंगाल - 8, 898, महाराष्‍ट्र- 7, 472, ओडिसा - 5, 356 रूपये कर हस्तांतरण करण्यात आले आहे. तसेच, इतर राज्यांना त्यांचा वाटा देण्यात आला आहे. असे 1,18,280 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

Terrorist Hafiz Saeed: हाफिज सईदवर कधी कारवाई होणार? पत्रकाराच्या जळजळीत प्रश्नावर पाकिस्तानी PMची लाजिरवाणी पळापळ; भारताचा सज्जड दम ठरला खरा VIDEO

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

SCROLL FOR NEXT