Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Mining in Goa: ...यामुळे गोवा खाण विभागाची केंद्राकडून कानउघडणी

खाणीतून बाहेर टाकलेले कमी दर्जाचे खनिज डम्प, त्यांचे मोजमाप, एकूण क्षेत्रफळ याविषयीची माहिती देण्याची सूचना खनिज धोरण-2013 मध्ये होती.

दैनिक गोमन्तक

Mining in Goa: खाणीतून बाहेर टाकलेले कमी दर्जाचे खनिज डम्प, त्यांचे मोजमाप, एकूण क्षेत्रफळ याविषयीची माहिती देण्याची सूचना खनिज धोरण-2013 मध्ये होती. मात्र, त्यानुसार गोवा खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने यावर कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट करत गोेव्याच्या खाण खात्याला केंद्रीय समितीने फटकारले आहे.

केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या बंगळुरू येथील प्रादेशिक उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच झाली. गोवा खनिज धोरण 2013 मधील मुद्द्यांनुसार खाणीतून बाहेर टाकलेले कमी दर्जाचे खनिज डम्प, त्यांचे एकूण मोजमाप, एकूण क्षेत्रफळ याविषयीची सविस्तर माहिती देण्याची सूचना होती.

मात्र, राज्याच्या खाण खात्याकडून याबाबत काहीच कार्यवाही केली नसल्याने या बैठकीमध्ये खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याला या समितीने कडक शब्दांत फटकारले असून यासंबंधीची माहिती नव्याने सादर करण्यास सांगितले आहे.

लोहखनिजाचा दर्जा, मूल्यमापन करण्याचे वैधानिक कर्तव्य पार पाडण्यात गोव्याचे खाण खाते अपयशी ठरल्याचे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हटले आहे.

कार्यवाही आणि निष्कर्षही नाहीत

समितीच्या या बैठकीत राज्यातील वन क्षेत्रात असलेल्या एकूण डम्पची संख्या, निकाली काढलेले डम्प यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. वन क्षेत्रातील डम्प किंवा थेट नाकारलेल्या खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब केला, याची माहिती देण्याचेही आदेश समितीने राज्य सरकारला दिले होते.

गोवा खनिज धोरण 2013 मध्ये सर्व प्रक्रिया नमूद असताना त्यावर कार्यवाही केलेली नाही आणि निष्कर्ष सादर केलेले नाहीत, असे समितीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT