Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाण क्षेत्राला मिळणार चालना!केंद्राने 58 ग्रेड खालील खनिज मालावरील निर्यात कर हटवला

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्राने 58 ग्रेड लोहखनिजावरील निर्यात शुल्क हटविला असुन या बाबत सीएम सावंत यांनी गोव्याच्या विनंतीचा विचार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे आभार मानले, तसेच खाण क्षेत्राला चालना देणारे निर्यात शुल्क मागे घेतल्याबद्दल एफएम निर्मला सीतारामन यांचे देखील आभार मानले.

(Center scrapped export tax on mineral commodities below grade 58 in goa mining)

खनीज निर्यात शुल्कात ५०% पर्यंत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, कमी दर्जाच्या लोहखनिजावरील निर्यात शुल्क सरकारने मागे घ्यावे अशी मागणी केंद्राकडे केली होती. लोहखनिजावरील निर्यात शुल्क 30% वर परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली होती. केंद्राने 58 ग्रेड लोहखनिजावरील निर्यात शुल्क हटविला आहे.

राज्यातील खाणी सुरू होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या खाणींचा लिलाव करण्यासाठी केंद्राकडून प्राधान्यक्रमाने परवानगी दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. हैदराबाद येथे खाणमंत्र्यांची परिषद सुरू असून त्यात गोव्यातून सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील खाणी लवकर सुरू करण्याची मागणी केली.

राज्यातील खाणी सुरू होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने त्याची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात काही राज्यातील नवीन खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात येणार असून त्यासंदर्भातचे सोपस्कार खाण खात्याला करण्याचे निर्देश यापूर्वीच खाणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT