Sateri Kelbay Mandal  Dainik Gomantak
गोवा

सातेरी केळबाय मंडळाचा चौदावा वर्धापनदिन उत्साहात

प्रमुख पाहुणे म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली : लाडफे येथील श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक मंडळाचा चौदावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. अन्य मान्यवरात उद्योजक हेमंत पिळगावकर, लाटंबार्सेचे सरपंच ज्ञानेश्वर गावस, पंच कुंदा च्यारी, देवस्थानचे अध्यक्ष विष्णू मळीक आणि ज्येष्ठ कलाकार साबाजी मोपकर यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना आमदार डॉ. शेट्ये यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेसाठी इमारत बांधून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही डॉ. शेट्ये यांनी दिले. हेमंत पिळगावकर, कुंदा च्यारी आणि विष्णू मळीक यांनी मनोगत व्यक्त केले. रघुनाथ परब यांनी सूत्रसंचालन केले आणि रोहित मोपकर यांनी आभार मानले. या सोहळ्यानंतर "देवता" हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

मान्यवरांचा सत्कार

वर्धापनपन दिनानिमित्त पंचायत क्षेत्रातील सहा कलाकारांचा आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदाशिव चंद्रकांत च्यारी, विठ्ठल हळदणकर (लाडफे), वासू गावस (खरपाल), एकनाथ मोर्लेकर (कासारपाल), साईनाथ कानोळकर (नानोडा) आणि बाबली गावकर (उसप) यांचा सत्कारमूर्तीत समावेश होता. श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक महिला मंडळ सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT