CCTV will be replaced in Sonsodo project Dainik Gomantak
गोवा

सोनसोडोवरील सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याचा निर्णय

अज्ञाताकडून परिसरात कचरा टाकण्याचा प्रकार, राय पंचायतीचा कारवाईचा इशारा

आदित्य जोशी

फातोर्डा : सोनसोडोपासून राय येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तीकडून कचरा टाकला जात आहे. याप्रकरणी सोनसोडो येथे देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या जागी उच्च क्षमतेचे कॅमेरे लावण्याचा निर्णय राय पंचायतीतर्फे घेण्यात आला आहे. (CCTV will be replaced in Sonsodo project News Updates)

सोनसोडो (Sonsodo) येथे कार्यान्वित असलेले सीसीटीव्ही कॅमेरे (Camera) स्पष्ट चित्रे टीपू शकत नसल्याने त्यांच्या जागी उच्च दर्जाचे स्पष्ट चित्रे टिपू शकणारे नवीन कॅमेरे बसवले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय राय पंचायतीतर्फे घेण्यात आला आहे. या ठिकाणी एकंदरीत उच्च क्षमतेचे 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

सोनसोडो पासून राय आणि कुडतरीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा हा कचरा (Garbage) अनोळखी व्यक्तीकडून टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथील परिसरात दुर्गंधीसह आरोग्यासाठी हानिकारक वातावरण बनलं आहे. रस्त्याच्या महत्वाच्या ठिकाणी पहिल्यांदा 2 कॅमेरे प्रायोगिक तत्वावर स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर इतर ठिकाणी उर्वरित कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे राय पंचायतीकडून सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT