CCTV Cameras on Atal Setu Dainik Gomantak
गोवा

आता अटल सेतूवर तपासला जाणार वाहनांचा वेग; 'सीसीटीव्ही' कार्यरत

अटल सेतूवर वेग नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. इथून पुढे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा वेग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : झुआरी पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर अनेकांनी सरकारप्रती आपली नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

(CCTV Cameras on Atal Setu)

वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवतात आणि त्यामुळे आपघातांना आमंत्रण मिळते. त्यामुळे आता सरकारने ठोस पावले उचलत कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर आता अटल सेतूवर वेग नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. इथून पुढे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा वेग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला जाणार आहे. अतिवेगात वाहन चालवणाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक बसणार आहे.

दरम्यान, 'गोव्यात आतापर्यंत रात्रीच्यावेळी झालेले 90 ते 95 टक्के अपघात हे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे झाले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे.

खरतर मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना फक्त दंड घेऊन सोडण्यात येते. पण यात बदल झाला पाहिजे. यावर निर्बंध घालण्यासाठी कायद्यात बदल करण्याचीही सरकारची तयारी आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT