Sonali Phogat Murder case Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case| सोनाली फोगाट प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईतील सीबीआय पथक गोव्यात दाखल

अधिकारी रेचपाल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाचा ताबा हणजूण पोलिसांकडून आज घेणार आहे त्याची प्रक्रिया सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईतील सीबीआय पथक आज गोव्यात दाखल झाले असून अधिकारी रेचपाल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाचा ताबा हणजूण पोलिसांकडून आज घेणार आहे त्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, सोनाली फोगट यांचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच सीबीआय चौकशीची मागणी करत होते.

(CBI team from Mumbai reached Goa to investigate Sonali Phogat case)

यासाठी त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन लेखी अर्ज दिला होता. त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पत्र लिहिले होते.

कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती

दोन दिवसांपूर्वी, सोनाली फोगट यांची बहीण रुकेश यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमागे राजकीय हेतू असल्याचा संशयही व्यक्त केला होता. रुकेश म्हणाल्या होत्या की, "केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासानंतरच सत्य बाहेर येईल. गोवा पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाही. गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास मालमत्तेच्या कोनातून करत आहेत. या हत्येमागे राजकीय हेतू असू शकतो. मोठे लोक असू शकतात. सोनालीची हत्या राजकीय कारणावरुन झाली असावी, त्यामुळे तपास व्हायला हवा."

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूरी दिली होती

या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सरकारवर दबाव आणल्याबद्दल कुटुंबीयांनी खाप पंचायतींचे आभार मानले आहेत. रुकेश पुढे म्हणाल्या की, "खाप पंचायतींनी पूर्ण सहकार्य केले. खाप पंचायतींमुळेच हरियाणा (Haryana) आणि गोवा (Goa) सरकारवर दबाव निर्माण झाला." सोनाली फोगट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी रविवारी हिसारमध्ये खाप महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, सोनाली यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सोमवारी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) मंजूरी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT