Rape case in Goa Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 9 वर्षांनी संशयिताची ओळख पटली

मुरगाव तालुक्यातील घटना, सीबीआयकडून पश्चिम बंगालच्या आरोपीचा तपास सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात 9 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संशयिताची ओळख पटवण्यात यश आलं आहे. सीबीआयने संशयिताची ओळख पटवली असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. सीबीआयने आता पुन्हा याप्रकरणी तपास सुरु केला असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

मुरगाव तालुक्यातील एका सात वर्षीय मुलीवर 9 वर्षांपूर्वी बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती. स्वच्छतागृहात लहान मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला होता, मात्र आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना (Police) अपयश आलं होतं. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थातच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. मात्र आरोपीची ओळख पटवण्यात आली नव्हती.

आता तब्बल 9 वर्षांनी सीबीआयने (CBI) बलात्कार प्रकरणातील आरोपीची ओळख पटवली असून पुन्हा तपास सुरु करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संशयित मुर्शिदाबाद, पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो गोव्यात राहात होता, अशी माहिती मिळाली आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी गोवा पोलीस (Goa Police) आणि सीबीआयकडून तीन वेगवेगळी रेखाचित्रही जारी करण्यात आली होती. अखेर संशयिताची ओळख पटल्याने तपासाला गती मिळणार आहे.

याप्रकरणाचा तपास जवळपास चार वर्षं सुरु होता. मात्र कोणताही धागादोरा सापडत नसल्याने 2017 मध्ये सीबीआयने वास्कोतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केसची फाईल बंद करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र मुलीच्या पालकांनी आक्षेप घेतल्याने याप्रकरणी पुन्हा तपास सुरु करण्यात आला होता. आता संशयिताची ओळख पटल्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT