corona  Dainik Gomantak
गोवा

सावधान...! गोव्यात कोरोना वाढतोय

राज्यात शनिवारी कोरोनाचे 14 नवे रुग्ण सापडले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात शनिवारी कोरोनाचे 14 नवे रुग्ण सापडले. सध्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून संक्रमणाचा दरही 2.32 टक्के इतका झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 77 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 562 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 653 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 832 वर कायम आहे. शनिवारी 603 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात चौथ्या लाटेचा धोका जरी नसला, तरी लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT